भरधाव कारची हातगाड्या, दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक

भरधाव कारची हातगाड्या, दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक
Published on

भरधाव कारची हातगाड्या, दुचाकींना धडक
कल्याणच्या डी. बी. चौकात तिघे जखमी; कारचालक पोलिसांच्या ताब्यात

कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील वर्दळीच्या डी. बी. चौक परिसरात सोमवारी भरधाव स्विफ्ट कारने हातगाड्या, दुचाकींना धडक देत पादचाऱ्यांना उडविल्याची घटना घडली. या अपघातात तिघे जखमी झाले असून, दोन दुचाकी आणि हातगाड्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला वडे विक्री करणाऱ्या महिलेलाही गरम तेल उडल्याने दुखापत झाली.
डी. बी. चौक परिसरातून भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यालगत असलेल्या हातगाड्यांसह दोन दुचाकींना धडक दिली. या धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघातात एका महिलेसह तीन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वडेविक्री करणाऱ्या महिलेवर गरम तेल उडाल्याने ती जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ५५ वर्षीय कारचालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कारमध्ये मद्याच्या बाटल्या आणि ग्लास आढळल्याने चालकाने मद्यप्राशन केले होते का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच कार चालविताना ब्रेकऐवजी चुकून ॲक्सिलरेटर दाबला गेल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

खडकपाडा पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून, जखमींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com