

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कापूरबावडी आणि बाळकुम परिसरातील दोन घरांवर डल्ला मारत तब्बल ९ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दोन्ही घटनांमध्ये कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोकड चोरीला गेली आहे.
कापूरबावडी नाका येथील अमराईनगर झोपडपट्टीत राहणारे मिस्त्री राजू पोतन हे २७ ऑगस्टला पत्नीसमवेत भिवंडी येथे नातेवाइकांकडे गेले होते. घरात आजारी आई असल्याने दरवाजा उघडा ठेवला होता. सायंकाळी घरी परतल्यानंतर खोलीतील कपाटाचा ड्राव्हर उघडा असल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता दोन सोनसाखळी, चार बांगड्या, चांदीचे पैंजण आणि सोन्याची बाळी असा पाच लाख चार हजारांचा ऐवज गायब असल्याचे समोर आले. दुसरी घटना बाळकुम पाडा क्रमांक दोन येथील देवकीबाई सदनमध्ये १० ऑगस्टला घडली. उमाशंकर मिश्रा आणि त्यांची पत्नी कामावर गेल्यानंतर घरातील कपाटातून सोनसाखळी, अंगठ्या, झुमके, टिकली साखळी, मंगळसूत्राच्या वाट्या, नेकलेस, नथनी आणि २५ हजारांची रोकड असा तब्बल चार लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. तक्रारदार मिश्रा यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्याने त्यांना तक्रार देण्यास उशीर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.