

आगरदांड्याच्या पर्यटन विकासाला चालना
जेट्टीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याचे लोकार्पण
मुरूड, ता. १ (बातमीदार) : आगरदांडा जेट्टीकडे जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पोहोच रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश विजय माळी यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या नूतन रस्त्यामुळे मुरूडसह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांना खाडीमार्गे जोडणाऱ्या आगरदांडा जेट्टीकडे जाणारी वाहतूक अधिक व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास विघ्नेश माळी यांनी व्यक्त केला.
पंचक्रोशीतील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार असल्याचे माळी यांनी सांगितले. आगरदांडा जेट्टीच्या नव्या मार्गामुळे पर्यटनासह आर्थिक क्षेत्रालाही नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने आणि विघ्नेश माळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला. त्यामुळे हा विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
समारंभाच्या प्रारंभी राजे शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुरूड पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी जंगम यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले, तर विघ्नेश माळी यांच्या हस्ते फीत कापून रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी दिनेश मिनमिने, अश्विनी जंगम, गणेश नाक्ती, भरत बेलोसे, तृप्ती पाटील, स्नेहाताई पाटील, ऋषिकांत डोंगरीकर, दीपेश वरणकर, यशवंत पाटील, मनोज कमाने, मंदाताई ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सोबत : लोकार्पण सोहळ्याचे छायाचित्र.
फोटो : विघ्नेश माळी यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण करताना उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.