

एसआरए प्रकल्पातील फ्लॅटचा ताबा न दिल्याने ८५ लाखांची फसवणूक
अँटॉप हिल पोलिसांत गुन्हा दाखल
चेंबूर, ता. १ (बातमीदार) ः एसआरए प्रकल्पातील फ्लॅट बुक करून त्याची संपूर्ण ८५ लाख रुपये रक्कम स्वीकारल्यानंतरही फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी एका महिला बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तुषार महेंद्र पारेख यांनी आरोपी पूनम आशित दोषी यांच्या जेऊस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या एसआरए प्रकल्पातील इंदिरानगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, सायन-कोळीवाडा येथील ए विंगमधील फ्लॅट क्रमांक ३०५ बुक केला होता. या फ्लॅटच्या मोबदल्यात तक्रारदारांनी ८५ लाख रुपये पूर्ण रक्कम अदा करून ३० नोव्हेंबर २०१५ला सेल डीड ॲग्रीमेंट केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. यानंतर तक्रारदारांनी त्या फ्लॅटवर ३० लाख रुपयांचे मॉर्गेज कर्ज घेतले; मात्र फ्लॅटचा ताबा देण्याबाबत आरोपींकडून विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारांनी प्रत्यक्ष फ्लॅटची पाहणी केली असता ही जागा झोपडपट्टीधारकांना ट्रान्झिट कॅम्प म्हणून राहण्यासाठी देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फ्लॅटची पूर्ण रक्कम स्वीकारून करार केल्यानंतरही ताबा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप करीत तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबर २०१५ ते १ मे २०२३ या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश कांबळे करीत असून, अँटॉप हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.