जुन्या भांडणाचा रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला

जुन्या भांडणाचा रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला
Published on

जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला
अंबरनाथमध्ये भाऊ-बहिणीलाही मारहाण

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : जुन्या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी तरुणासह त्याच्या भाऊ-बहिणीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये सोमवारी (ता. ३१) घडली. या घटनेवेळी एकाने कोयत्याने तरुणाच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्यात तरुण जखमी झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद विकास गायकवाड (१६) यांच्या तक्रारीवरून करण खिमची, पवन सिंग, विनीत मोरे आणि अभय या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हर्षद त्याचा भाऊ मंथन आणि मित्र सिद्धेश यांच्यासोबत घरी जात होता. त्यावेळी पूर्ववैमनस्यातून आरोपी मोटारसायकलवरून तेथे आले. आरोपींना पाहताच सिद्धेश तेथून पळून गेला. त्यानंतर आरोपींनी हर्षद, मंथन आणि त्यांची बहीण जान्हवी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान आरोपी अभय याने कोयता काढून हर्षदच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. हर्षदने बचावासाठी हात पुढे केल्याने कोयत्याचा वार त्याच्या हातावर बसला. यात हर्षद जखमी झाला. याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया देशमुख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com