

१३ वर्षांनंतर पतीला जन्मठेप
पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळले
उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : मद्यप्राशन करण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळणाऱ्या पतीला तब्बल १३ वर्षांनंतर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या हत्याकांडात कल्याण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी महानसिंग ऊर्फ रॉबिन मानसिंग थापा याला दोषी ठरवत १० हजारांचा दंडही ठोठावला.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात २०१३ मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी आणि मृत महिला पती-पत्नी असून दोघेही उल्हासनगरातील एका इमारतीत वॉचमनचे काम करीत होते. घटनेच्या दिवशी त्याने पत्नीकडे मद्यप्राशन करण्यासाठी पैसे मागितले. तिने नकार दिल्याने संतप्त आरोपीने घरातील रॉकेल तिच्या अंगावर ओतून काडी पेटवली. यात महिला सुमारे ९० टक्के भाजली आणि मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात आरोपीला कल्याण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ताम्हणेकर यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जन्मठेपेसह १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता सचिन कुलकर्णी व खंडागळे यांनी बाजू मांडली असून साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.