दुचाकी चोरून दुकानांमध्ये घरफोड्या

दुचाकी चोरून दुकानांमध्ये घरफोड्या
Published on

अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : दुचाकी चोरी करून त्याच वाहनाचा वापर करत अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरातील बंद गाळ्यांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तुळशीराम मंजुळकर (२७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन दुचाकींसह एकूण एक लाख २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

कानसई येथील गुलमोहर सोसायटी परिसरातील माया केमिस्ट मेडिकलचे शटर उचकटून चोरी केल्याची घटना २१ ऑगस्टला पहाटे तीनच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी प्रकाश सिरवी यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची बारकाईने तपासणी केली. त्यातून मंजुळकर याचा शोध लागला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ३० ऑगस्टला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीतील चौकशीत त्याने शिवाजीनगर, हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून दोन दुचाकींसह अन्य तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील तीन आणि हिललाईन पोलिस ठाण्यातील दोन, असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गहिणीनाथ गमे आणि तपास पथकाने केली. पुढील तपास पोलिस अंमलदार नीलेश बोडके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com