कुर्डुस येथे विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा

कुर्डुस येथे विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा
Published on

कुर्डूस येथे विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा
३१ वर्षांपासून जपली जाते अनोखी परंपरा
पोयनाड, ता. २ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील देऊळ आळीमध्ये गेल्या ३१ वर्षांपासून विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची अनोखी परंपरा जपली जात आहे.
पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे आणि केणी परिवारातील शेतकरी तरुणांनी १९९२ मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला विहिरीच्या कठड्यावर तसेच सीताफळाच्या झाडाचा आधार घेत हंडी फोडली जात होती. आता मात्र विहिरीच्या मध्यभागी हंडी बांधली जाते. कठड्यावर थर रचून त्यावरून उडी घेत हंडी फोडण्याचा हा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.
दहीहंडी फोडण्यासाठी गावातील तरुण १५ ते २० दिवस आधीपासून सराव करतात. यंदा शनिवार (ता. ५) होणाऱ्या दहीहंडीत बाहेरील गोविंदा पथकेही सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे आजवर कोणालाही दुखापत झाली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

चौकट :
कोणालाही दुखापत होत नाही
विहिरीच्या मध्यभागी बांधली जाणारी ही दहीहंडी फोडण्यासाठी विहिरीच्या कठड्यावर गोविंदा एकमेकांच्या खांद्यावर थर रचून त्यावरून उडी मारून ही दहीहंडी फोडतात. हे करीत असताना कोणतीही दुखापत अथवा इजा कोणालाही होत नाही किंवा आजपर्यंत कोणालाही झालेली नाही, हे या विहिरीतील दहीहंडीचे वैशिष्ट्य आहे.

तरुणांचा सरावावर भर
कुर्डूस ग्रामस्थांच्या पुढाकाराने ही दहीहंडी आयोजित केली जाते. विहिरीच्या मध्यभागी ही दहीहंडी बांधली जात असल्याने ती फोडण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. जवळपास १५ ते २० दिवस अगोदर या कुर्डूस गावातील तरुण आपली नोकरी, शिक्षण, व्यवसाय सांभाळून ही दहीहंडी फोडण्याचा सराव करीत असतात.

पोयनाड : कुर्डूस येथील देऊळ आळी येथे विहिरीच्या मध्यभागी बांधल्या जाणाऱ्या दहीहंडीची संग्रहित छायाचित्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com