वाशीतील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न

वाशीतील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न
Published on

वाशीतील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न
अग्निशमन एनओसी नसल्याचा तुषार कचरे यांचा दावा; सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याची मागणी
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : अमरावती येथील रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नवी मुंबईतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वाशीतील क्लाऊडनाईन रुग्णालयाकडे २०२४ पासून अग्निशमन विभागाचे वैध ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे तुषार कचरे यांनी केला आहे. रुग्णालयाच्या नोंदणीचेही नूतनीकरण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रुग्णालयांमध्ये नवजात बालके तसेच गंभीर रुग्ण उपचार घेत असल्याने अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे क्लाऊडनाईनसह नवी मुंबईतील सर्व रुग्णालयांच्या अग्निशमन एनओसी, आरोग्य विभागातील नोंदणी तसेच बांधकाम व वापराच्या परवानग्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी कचरे यांनी केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच आवश्यक तपासणी करून त्रुटी दूर करणे गरजेचे असल्याचे कचरे यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी दिला आहे. रुग्णसेवेला विरोध नसून रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, अशी भूमिका कचरे यांनी स्पष्ट केली.

दुर्घटनेपूर्वीच तपासणीची गरज
रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांची नियमित तपासणी करून त्रुटी आढळल्यास वेळेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे अमरावतीसारखी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने रुग्णालयांच्या सुरक्षेची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com