‘डीपीएस’ तलावाच्या संरक्षणाला विलंब

‘डीपीएस’ तलावाच्या संरक्षणाला विलंब
Published on

‘डीपीएस’ तलावाच्या संरक्षणाला विलंब
ऑक्टोबरपूर्वी रोहित पक्ष्यांसाठी तलाव परिसर अनुकूल करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नवी मुंबईतील डीपीएस तलावाच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. सुमारे १२ हेक्टर क्षेत्रफळाच्या या पाणथळ जागेला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी मागणी पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली आहे. आगामी स्थलांतरित पक्ष्यांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरपूर्वी तलाव परिसर रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांसाठी अनुकूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सिडकोकडून भरती-ओहोटीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेल्याने तलावात चिखल साचत असल्याचे ‘नेट कनेक्ट फाउंडेशन’चे म्हणणे आहे. याचा परिणाम जलपक्षी आणि इतर जलचरांच्या अधिवासावर होत असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांनी सांगितले. डीपीएस तलावाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव राज्य वन्यजीव मंडळाने मंजूर केला आहे. मात्र अंतिम शासन निर्णय अद्याप झालेला नसल्याने संवर्धनाची प्रक्रिया रखडल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
वन विभागाचा सविस्तर प्रस्ताव ऑक्टोबर २०२५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. डीपीएस तलाव हा पक्ष्यांचा अधिवास असण्यासोबतच पावसाचे अतिरिक्त पाणी साठविणारे नैसर्गिक क्षेत्र आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन झाल्यास जैवविविधतेसोबतच परिसरातील पूरस्थितीचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

ऑक्टोबरपूर्वी निर्णयाची अपेक्षा
आगामी फ्लेमिंगो हंगामापूर्वी तलावाला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा नैसर्गिक जलप्रवाह आणि जैवविविधता जपावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com