बालगोपालांसाठी कृष्ण-राधेच्या वेशभूषांना मागणी

बालगोपालांसाठी कृष्ण-राधेच्या वेशभूषांना मागणी
Published on

बालगोपालांसाठी कृष्ण-राधेच्या वेशभूषांना मागणी
आकर्षक पोशाखांनी नवी मुंबईतील बाजारपेठा फुलल्या
नेरूळ, ता. २ (बातमीदार) : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये सणाच्या खरेदीची लगबग वाढली आहे. बालगोपालांना श्रीकृष्णाच्या रूपात सजविण्यासाठी पालकांची लगबग सुरू असून, लहान मुलांसाठीच्या आकर्षक कृष्ण-राधा वेशभूषांना मागणी आहे. शाळा, सोसायट्या तसेच विविध सामाजिक संस्थांकडून कृष्ण जन्मोत्सव, वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने यंदाही बालकृष्णाच्या पोशाखांना विशेष पसंती मिळत आहे.
बाजारात लहान मुलांसाठी रंगीबेरंगी धोतर-कुर्ता, फेटे, मोरपिसांनी सजविलेले मुकुट, बासरी, हार आणि विविध अलंकारांचे संच उपलब्ध आहेत. मुलींसाठी राधेची पारंपरिक वेशभूषा तसेच आकर्षक घागरा-चोळीचे विविध पर्याय आहेत. पारंपरिक पोशाखांसोबत आधुनिक डिझाइनचे कपडेही उपलब्ध झाले आहेत. कृष्णाचे धोतर-कुर्ता २५० ते ५०० रुपये, मुकुट १०० ते ३०० रुपये, तर तयार कृष्ण वेशभूषेचे संच १५० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. राधेची घागरा-चोळी ४०० ते ८०० रुपये, तर दागिन्यांसह पूर्ण वेशभूषा ७०० ते १,२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

मागणी वाढल्याने विक्रेत्यांनी वाढविला साठा
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वेशभूषा आणि सजावटीच्या साहित्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. पालकांकडून विशेषतः मुकुट, मोरपिसे, बासरी, हार, कडे आणि इतर अलंकारांची खरेदी केली जात आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध रंग, आकार आणि डिझाइनचे पोशाख मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. लहान मुलांच्या वय आणि आकारानुसार पोशाखांचे पर्याय उपलब्ध असल्याने पालकांना आपल्या पसंतीची वेशभूषा निवडणे सोपे झाले आहे. त्यामुळे जन्माष्टमीपूर्वी बाजारपेठांमध्ये बालकृष्ण आणि राधेच्या वेशभूषांची खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी वाढत असून, विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com