उल्हासनगरला आधुनिक रूप

उल्हासनगरला आधुनिक रूप
Published on

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : धोकादायक इमारती, दाटीवाटीची बांधकामे आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या उल्हासनगरच्या कायापालटाचा मार्ग आता क्लस्टर विकासामधून मोकळा होण्याची चिन्हे आहेत. क्लस्टरच्या अटी शिथिल करून प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिकांना सुरक्षित आणि हक्काचे घर मिळण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.

शहरातील धोकादायक इमारतींचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासह उल्हासनगरचा नियोजित आणि आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने क्लस्टर विकास प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत क्लस्टर प्रकल्पामधील अडथळे दूर करण्यासह आवश्यक अटींमध्ये शिथिलता आणण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महापौर अश्विनी निकम, महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, सभागृह नेते अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह नगरसेवक, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पायाभूत सुविधा मिळण्यास मदत
दाट लोकवस्ती आणि मोठ्या प्रमाणावर जुन्या व धोकादायक इमारती असलेल्या उल्हासनगरमध्ये पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंटची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करून नागरिकांना सुरक्षित, नियोजित आणि हक्काची घरे उपलब्ध करून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. या प्रकल्पामुळे केवळ धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणार नसून शहराच्या पायाभूत सुविधा आणि एकूणच नागरी रचनेत मोठा बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com