ऋतुजा पाटीलसह पूर्वीच्या सहाही आरोपींना पोलिस कोठडी

ऋतुजा पाटीलसह पूर्वीच्या सहाही आरोपींना पोलिस कोठडी
Published on

ऋतुजा पाटीलसह
इतरांना पोलिस कोठडी

एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी कारवाई

मुंबई, ता. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदभरती परीक्षा पेपरफुटीप्रकरणी नव्याने अटक केलेल्या ऋतुजा पाटीलसह पूर्वीच्या सहाही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ऋतुजा पाटीलला ५ सप्टेंबरपर्यंत, तर इतर सहा आरोपींना ७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
नंदुरबारहून अटक केलेल्या ऋतुजाचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. या मोबाईलमधून गौरव पाटीलला फुटलेला पेपर पाठवण्यात आला होता. हा मोबाईल गुन्ह्यातील मुख्य स्रोत असल्याने तो हस्तगत करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपींच्या चौकशीत आणखी काही मोठे खुलासे झाले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी असलेला एमपीएससीचा अधिकारी विश्वेश्वर नखातेने वापरलेला लॅपटॉप पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच खाडीत फेकला होता. पोलिसांनी तो शोधून काढला असून त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयाला दिली. ‘कौटिल्य क्लासेस’चा संचालक आणि आरोपी प्रवीण पाटीलच्या घरातून आर्थिक नोंदींचे काही दस्तऐवज सापडले आहेत. इतर आरोपींची आणि ऋतुजा पाटीलची समोरासमोर चौकशी होणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद घेऊन न्यायालयाने ऋतुजाला ५, तर इतर सहा आरोपींना ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com