गावो गावी लागले रास्ता रोको आंदोलनाचे फलक

गावो गावी लागले रास्ता रोको आंदोलनाचे फलक
Published on

गावांच्या वेशीवर आंदोलनाची हाक
वाडा तालुक्यात रास्ता रोकोपूर्वी फलकबाजी

वाडा, ता. ३ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील १७ संवर्गातील नोकऱ्यांमध्ये बिगर आदिवासी समाजघटकांचे आरक्षण शून्य केल्याच्या निषेधार्थ आरक्षण हक्क बचाव समिती वाडा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला तालुक्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून गावोगावी फलकबाजीतून जनजागृती केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील नोकरभरतीमध्ये एससी, एनटी, अन्य सर्व बिगर आदिवासी समाज घटकांचे आरक्षण शून्य केले आहे. या निर्णयामुळे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांप्रमाणे कंत्राटी मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्थानिक एससी, एनटी, सर्व बिगर आदिवासी समाजघटकांच्या उमेदवारांची प्राधान्याने भरती करा, अशी आंदोलकांची मागणी आहे. २०१४ पासून बिगर आदिवासी समाजाच्या वतीने या मागणीचा पुनरुच्चार होत आहे; मात्र बिगर आदिवासी समाजाला न्याय मिळालेला नाही. याउलट शासन रोज विविध नोकरभरतीचे नवनवीन निर्णय घेत नोकरभरती करीत आहे, त्यामुळे कंत्राटी शिक्षक बाधित झाले आहेत.
--------------------
वाडा तालुक्यातील गावागावांच्या वेशीवर आंदोलनाचे फलक लागले आहेत. बिगर आदिवासी समाज संतप्त झाला आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’चा नारा दिल्याने हजारोंचा जनसमुदाय एकवटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com