

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन अर्थात सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
अचानक हृदयविकाराचा झटका येणे, हृदयक्रिया बंद पडणे किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी सुरुवातीच्या काही मिनिटांना विशेष महत्त्व असते. अशा वेळी योग्य पद्धतीने सीपीआर करता येणे हे महत्त्वाचे जीवनरक्षक कौशल्य आहे. याच उद्देशाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सीपीआरचे महत्त्व, रुग्णाची प्राथमिक तपासणी, आपत्कालीन मदत मिळविण्याची प्रक्रिया, छातीवर दाब देण्याचे योग्य तंत्र आणि आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. उपक्रमाला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यात सीपीआरसोबतच आपत्कालीन प्रथमोपचार, आरोग्य तपासणी, हृदयविकार प्रतिबंध आणि जीवनशैलीजन्य आजारांबाबत जनजागृती यांसारखे उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोईड्डीस, डॉ. काम्रान, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हमाड, वैद्यकीय आरोग्य विभागाचे डॉ. संदीप गाडेकर, डॉ. बुशरा सय्यद, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.