खोटा वारस दाखला बनवून कोट्यवधींचा गंडा

खोटा वारस दाखला बनवून कोट्यवधींचा गंडा
Published on

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये मालमत्ता हडपण्यासाठी खोटा वारस दाखला तयार करून एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाची दिशाभूल करत खरा वारसदार लपवून बनावट कागदपत्रांआधारे मालमत्तेची विक्री करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कल्याण-अंबरनाथ रोडवरील शांतीनगर परिसरातील हनुमान मंदिराजवळील ३६२२ चौरस फूट मालमत्तेची खरी वारसदार इंद्रजितकौर असताना, त्यांची माहिती लपवून बनावट वारस दाखला मिळवण्यात आला. त्यानंतर तो उल्हासनगर महापालिकेत सादर केला. त्या आधारे मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्यात आली. या मालमत्तेतील भाडेकरूंनी या आधीच दिवाणी दावा दाखल केला असतानाही ही बाब लपवून खरेदीखत व इतर करारनामे करण्यात आले. या संपूर्ण बनावटगिरीतून फिर्यादी विक्की टेकचंदाणी यांच्याकडून एक कोटी ३२ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी प्रीती गौतम, विजय गौतम, करण गौतम, गुरुपीत पठारे, विजय पठारे आणि प्रतीक पठारे या सहा जणांविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित मुंढे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com