उल्हासनगरात एकल महिलांचे सर्वेक्षण रखडले?

उल्हासनगरात एकल महिलांचे सर्वेक्षण रखडले?
Published on

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : राज्य सरकारच्या निर्देशानुसार एकल महिलांच्या सर्वेक्षणासाठी ३० ऑगस्ट ही अंतिम मुदत असतानाही उल्हासनगर महापालिका क्षेत्रात अद्याप व्यापक सर्वेक्षण झाल्याचे दिसत नाही. यामुळे हजारो एकल महिलांची माहिती सरकारपर्यंत कशी पोहोचणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर बागुल यांनी महापालिकेकडून तातडीने स्पष्टीकरण मागितले आहे.
राज्यातील महापालिका, नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील एकल महिलांची माहिती संकलित करून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, विभक्त राहणाऱ्या, निराधार; तसेच विविध कारणांमुळे एकट्याने जीवन जगणाऱ्या महिलांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना भविष्यात विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ३० ऑगस्ट ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, उल्हासनगर महापालिका क्षेत्रात आजपर्यंत एकल महिलांचे व्यापक स्वरूपात सर्वेक्षण झाले नाही, अशी तक्रार बागुल यांनी केली आहे. सर्वेक्षण न झाल्यास शहरातील हजारो एकल महिलांची माहिती सरकारपर्यंत कशी पोहोचणार आणि त्यांना प्रस्तावित योजनांचा लाभ कसा मिळणार, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बागुल यांनी महापालिका प्रशासनाकडे सर्वेक्षण झाले आहे का, किती महिलांची नोंदणी झाली, सरकारकडे माहिती कधी पाठविण्यात आली आणि मुदत का पाळली गेली नाही, याबाबत तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com