दिवाळे कोळीवाड्यात भटक्या कुत्र्यांची दहशत

दिवाळे कोळीवाड्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
Published on

दिवाळे कोळीवाड्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
रात्रीच्या वेळी नागरिकांचा पाठलाग; लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) ः दिवाळे कोळीवाडा परिसरात भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्री उशिरा कामावरून परतणारे चाकरमानी आणि पहाटेच्या वेळी मासेमारीसाठी बाहेर पडणाऱ्या कोळीबांधवांना श्वानांच्या कळपांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दिवाळे कोळीवाड्यातील रस्ते, गल्लीबोळ तसेच रहिवासी भागात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे श्वानांचे कळप लागणे, जोरजोरात भुंकत पाठलाग करणे आणि अंगावर धावून जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. दिवाळे कोळीवाड्यातील अनेक नागरिक पहाटेच्या वेळी मासेमारी तसेच व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी असल्याने भटक्या श्वानांचे कळप आक्रमकपणे पाठलाग करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने प्राणी जन्मनियंत्रण कार्यक्रम, निर्बीजीकरण आणि लसीकरण प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ तात्पुरती कारवाई न करता परिसराची पाहणी करून कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिवाळे कोळीवाड्याची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी आणि नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com