पनवेल महापालिका क्षेत्रात डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका;स्वाईन फ्लूचाही शिरकावअंमलबजावणी करण्याची मागणी

पनवेल महापालिका क्षेत्रात डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका;स्वाईन फ्लूचाही शिरकावअंमलबजावणी करण्याची मागणी
Published on

पनवेल महापालिका क्षेत्रात डेंगी-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्ल्यूचाही शिरकाव

शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा आरोग्य विभागाला इशारा; १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी

खारघर, ता. ३ (बातमीदार) : पनवेल पालिका क्षेत्रात डेंगी, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पनवेल परिसरात अधूनमधून पाऊस, त्यानंतर कडक ऊन आणि बदलते हवामान यामुळे डासांची उत्पत्ती तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पनवेल विधानसभा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून आजारांच्या परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी डेंगी-मलेरियाच्या संशयित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तसेच काही ठिकाणी मलेरिया तपासणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा शिवसेनेने केला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ३० ऑगस्टला पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. उपायुक्त वैभव विधाते यांच्या पुढाकाराने झालेल्या आढावा बैठकीत डासजन्य आजार, मलेरिया तपासणीतील त्रुटी, फवारणी-धुरीकरण आणि स्वाईन फ्ल्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपायुक्त अभिषेक पारडकर, डॉ. उषा राठोड, महामारीतज्ज्ञ डॉ. आकाश थसाळे, आरोग्य विभागप्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक संजय जाधव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर शिवसेनेच्या शिष्टमंडळात महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानवडे, खारघर शहर समन्वयक प्रणव कारखानीस आणि विभाग संघटिका ज्योती नाडकर्णी यांचा समावेश होता. पालिकेने मलेरिया तपासणी मोठ्या प्रमाणात वाढविणे, धुरीकरण व फवारणीची वारंवारता वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे, तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्ल्यू तपासणी सुविधा सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान, ही सर्व आश्वासने १५ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात लागू करावीत, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com