ठाणे विभागात एसटीचे ग्रुप बुकिंग अखेर बंद

ठाणे विभागात एसटीचे ग्रुप बुकिंग अखेर बंद
Published on

​कल्याण, ता. ४ (बातमीदार) : एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाअंतर्गत सुरू असलेले ग्रुप बुकिंग बुधवारी (ता. २) अखेर बंद करण्यात आले. या कालावधीत ४० ऐवजी ५५ आसनांचे ग्रुप बुकिंग करण्याची अट घालण्यात आल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रवाशांची वाढती नाराजी लक्षात घेऊन ठाणे विभागाने आपला हा निर्णय अवघ्या एका दिवसासाठी मागे घेतला होता; मात्र त्यानंतर पुन्हा ५५ आसनांची अट लादण्यात आली आणि ग्रुप बुकिंग थांबवण्यात आले. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना माघारी परतावे लागले आहे.

आतापर्यंत माेठ्या प्रमाणावर ग्रुप बुकिंग झाल्याने हे बुकिंग थांबवावे लागत असल्याचे ठाणे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यंदा ठाणे विभागाअंतर्गत अंदाजे अडीच हजारांहून अधिक बसचे ग्रुप बुकिंग झाले असण्याची शक्यता असून, यामध्ये राजकीय पक्षांमार्फत सोडण्यात येणाऱ्या हजारो बसचादेखील मोठा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर बस उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे विभागाला राज्यभरातील आगारांवर अवलंबून राहावे लागते.

गाड्यांची वाढलेली संख्या आणि उपलब्धतेचा विचार करून ठाणे विभागाअंतर्गत ग्रुप बुकिंग तत्काळ थांबविण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना बुधवारी (ता. २) देण्यात आल्या; मात्र एसटी महामंडळाच्या या सावळागोंधळामुळे आणि वारंवार बदलणाऱ्या नियमांमुळे प्रवासी संघटनांनी आणि सामान्य प्रवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com