दहीहंडीच्या दिवशी ठाण्यात कोंडीचे संकट

दहीहंडीच्या दिवशी ठाण्यात कोंडीचे संकट
Published on

ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : शहरातील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी ठाण्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात गोविंदा पथके दाखल होणार आहेत. त्याचा फटका ठाणे रेल्वे प्रवाशांसह शहरातील वाहतुकीला बसणार आहे. उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

ठाण्याचा दहीहंडी उत्सव ठाणेकरांची वाहतूक कोंडी करणारा ठरणार आहे. नऊ, दहा, अकरा थरांचे जागतिक विक्रमदेखील याच शहरात झाले आहेत. त्यामुळे इथला उत्सव पाहण्यासाठी देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. अशावेळी नागरिकांना कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली असली तरी उत्सवाचा उत्साह पाहता ठाण्यात लाखोंच्या संख्येत गोविंदा येणार असल्याने शहरातील रस्त्यांवर मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. दहीहंडी पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बांधल्या जाणाऱ्या मोठ्या हंड्यांच्या परिसरातील रस्तेदेखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. शविवार (ता. ५) सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करून शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

टेंभी नाका, टॉवर नाका, ब्राह्मण सभा हॉल परिसर तसेच स्थानक रोड येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने गोविंदा पथके व नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार काही मार्गांवर प्रवेश बंद करून वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

प्रवेश बंद : जीपीओ चौक, उर्जिता हॉटेलसमोरील मार्ग, मुस चौक.
पर्यायी मार्ग : क्रीक नाका मार्ग, बी कॅबिन, सॅटीस पूल मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com