जप्त केलेल्या मालामुळे पालिका कर्मचाऱ्यांना डेंगीचा धोका

जप्त केलेल्या मालामुळे पालिका कर्मचाऱ्यांना डेंगीचा धोका
Published on

जप्त केलेल्या मालामुळे पालिका कर्मचाऱ्यांना डेंगीचा धोका
अतिक्रमण नियंत्रण विभागाचे गोदाम स्थलांतरित करण्याची मागणी
मालाड, ता. ३ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेच्या मालाड पश्चिम विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून फेरीवाल्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत जप्त केलेले साहित्‍य एवरशाईन नगर येथील मुत्तू मारी नगर शिवशक्ती एसआरए परिसरातील गोदामात ठेवण्यात येत आहे. या जप्त साहित्‍यामध्‍ये फळे, भाज्या तसेच विविध खाद्यपदार्थांचा समावेश असतो. हा नाशवंत माल अनेक दिवस गोदामात पडून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून, रोगराईचा धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
या गोदामात काम करणारे महापालिकेचे दोन अधिकारी व कर्मचारीही मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाले आहेत. काही कर्मचाऱ्यांना डेंगीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोदामातील कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जप्त केलेला नाशवंत माल वेळेत हटविला जात नसल्याने तो कुजतो. त्यामुळे मच्छरांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने गोदामाची तातडीने स्वच्छता करावी, जप्त केलेला नाशवंत माल त्वरित हटवावा आणि भविष्यात असा माल रहिवासी परिसरात दीर्घकाळ साठवला जाणार नाही याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
डेंगीचा धोका लक्षात घेता अतिक्रमण निर्मूलन विभागाचे गोदाम रहिवासी परिसरातून अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी नागरिकांसह महापालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com