

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : गुजरात ते पडघादरम्यान हरित ऊर्जा वाहून नेणाऱ्या खावडा-४सी प्रकल्पासाठी वापर हक्कामुळे बाधित झालेल्या जमिनींच्या ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
या प्रकल्पात एकूण तीन हजार ९१६ लाभार्थी असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या तीन हजार ५३१ लाभार्थ्यांना आतापर्यंत नुकसानभरपाई देण्यात आली आहे. हे प्रमाण एकूण प्रकरणांच्या ९०.१६ टक्के आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये आवश्यक संमती, पुष्टीकरण आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना मोबदला देण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या विविध भागांतील पात्र जमीनमालक आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत ५० कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाईचे वितरण करण्यात आले आहे. चाणे गावातील लाभार्थी नारायण पाटील यांनी सांगितले की, जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्याने अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. घर बांधण्यासह मुलांच्या विवाहाचे स्वप्नही या पैशातून साकारता येत आहे. दिघाशी गावातील लाभार्थी रघुनाथ पाटील यांनी सांगितले की, केवळ जमिनीचीच नव्हे, तर पिकांचे आणि इतर नुकसानीची भरपाईही पारदर्शक पद्धतीने देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यवाही करून सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विश्वासाचे दीर्घकालीन नाते
खावडा-४सी प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ वीज पारेषणाची पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी शेतकऱ्यांशी विश्वासाचे दीर्घकालीन नाते निर्माण करण्यावर भर असल्याचे प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व समूह प्रमुख (कंपनी व्यवहार) निनाद पितळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.