पंडित रामा भगत उद्यानात उपद्रवींचा हैदोस

पंडित रामा भगत उद्यानात उपद्रवींचा हैदोस
Published on

पंडित रामा भगत उद्यानात मद्यपींचा त्रास

जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १२ येथील पंडित रामा भगत उद्यानात उपद्रवी नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने उद्यानाची सुरक्षा आणि स्वच्छता ऐरणीवर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना विसाव्यासाठी उभारलेल्या निवारा शेडचा वापर रात्रीच्या वेळी मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासाठी केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्यपान आणि तंबाखू सेवनानंतर शेडमध्येच कचरा टाकणे, थुंकून परिसर अस्वच्छ करणे, असे प्रकार होत असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पंडित रामा भगत उद्यानात सकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येतात. ज्येष्ठ नागरिकही फेरफटका मारल्यानंतर निवारा शेडमध्ये काही वेळ विश्रांती घेतात; मात्र शेडमध्ये मद्यपान करून निर्माण झालेली अस्वच्छता तसेच तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे नागरिकांना तेथे बसणेही अवघड झाले आहे. तसेच, या प्रकारामुळे डासांचे साम्राज्य निर्माण होत आहे. दरम्यान, उद्यानातील निवारा शेडचा गैरवापर करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच उद्यानात नियमित सुरक्षा रक्षकाची नियुक्ती, सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी आणि स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com