चिमुकल्यांच्या राधा-कृष्ण रूपाने खुलला दहीकाला उत्सव

चिमुकल्यांच्या राधा-कृष्ण रूपाने खुलला दहीकाला उत्सव
Published on

ठाणे, ता. ४ (बातमीदार) : भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व बालवयातच समजावे, तसेच पारंपरिक सणांशी त्यांची नाळ जोडली जावी, या उद्देशाने मावळी मंडळ शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज (ता. ४) दहीकाल्यासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

चिमुकल्यांच्या निरागस अभिनयाने आणि उत्साही सहभागाने शाळेचे वातावरण भक्तिमय आणि आनंदी झाले होते. उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या बाललीला, दहीहंडी तसेच दहिकाला उत्सवामागील सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच विविध पारंपरिक खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रभारी मानसी गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उत्सवात पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रोहन वाघ यांनी सांगितले, की आजच्या काळात मुलांचा मोबाईलकडे वाढता कल लक्षात घेता त्यांना फोनपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. पारंपरिक खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि सणांच्या माध्यमातून मुलांना आनंददायी वातावरणात शिकण्याची संधी मिळते. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com