कामोठ्यात नवा पायंडा

कामोठ्यात नवा पायंडा
Published on

कामोठ्यात नवा पायंडा; रस्त्यावरील मंडळांना परवानगी नाकारली
दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कठोर निर्णय; लेझर लाइट, ध्वनिप्रदूषणावरही अंकुश

पनवेल, ता. ४ (बातमीदार) : उत्सवांच्या नावाखाली रस्ते अडवून पादचारी आणि वाहनचालकांना होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी कामोठे पोलिसांनी यंदा कठोर भूमिका घेतली आहे. कामोठे परिसरातील रस्त्यांवर दहीहंडी आयोजनासाठी अर्ज करणाऱ्या मंडळांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे उत्सव आयोजनात शिस्त आणण्याचा एक नवा पायंडा पडला आहे.
रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, पादचाऱ्यांना ये-जा करताना अडथळा निर्माण होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीला अडथळा होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः दहीहंडी उत्सवासाठी रस्ते बंद करून मंडप, स्टेज किंवा अन्य संरचना उभारण्यास पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही कामोठे पोलिसांनी मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. गणेश मंडळांना त्यांच्या पारंपरिक आणि पूर्वनियोजित जागेवरच परवानगी देण्यात येणार असून रस्त्यावर नव्याने मंडळ उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे रस्त्यांवर नव्याने मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. उत्सवांमध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर करताना निर्धारित आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, तसेच लेझर लाइटचा वापर टाळावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही देण्यात आली आहे. उत्सव साजरे करताना परंपरा आणि उत्साहासोबतच शिस्त, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचे भान ठेवावे, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com