टीचर्स डेच्या आदल्या दिवशी उल्हासनगरातील सेवानिवृत्त शिक्षक रस्त्यावर उतरले, हक्काच्या सातव्या वेतन आयोगाची मागणी “सत्कार नको,हक्काचे वेतन द्या” शिक्षकांची हाक

टीचर्स डेच्या आदल्या दिवशी उल्हासनगरातील सेवानिवृत्त शिक्षक रस्त्यावर उतरले,
हक्काच्या सातव्या वेतन आयोगाची मागणी
“सत्कार नको,हक्काचे वेतन द्या” शिक्षकांची हाक
Published on

सत्कार नको, हक्काचे वेतन हवे!
सेवानिवृत्त शिक्षकांचे थकीत रकमेसाठी रस्त्यावर आंदोलन

उल्हासनगर, ता. ४ (बातमीदार) : सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेसाठी रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महापालिका मुख्यालयासमोर शुक्रवारी (ता. ४) शिक्षकांनी धरणे आंदोलन करीत थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी केली.
हातात फलक घेत आणि घोषणाबाजी करीत शिक्षकांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले. सातव्या वेतन आयोगाचे लाभ मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी आणि थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. याबाबत वारंवार निवेदने, बैठका आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘ज्या वयात सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्थैर्य मिळायला हवे, त्या वयात कष्टाचे पैसे मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. शिक्षक दिनी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यापेक्षा हक्काचे वेतन वेळेत देणे हाच खरा सन्मान आहे,’ अशी भावना आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात ‘कायद्याने वागा, लोकचळवळ’चे अध्यक्ष राज असरोंडकर, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, शिवाजी रगडे, ॲड. वनिता ओव्हाळेकर, प्रफुल्ल केदारे आदी सहभागी झाले होते. शिक्षकांचे आर्थिक हक्क प्रलंबित का ठेवण्यात आले, निधीचा अडथळा नेमका कुठे आहे आणि यासाठी जबाबदार कोण, याची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, याबाबत प्रशासन अधिकारी किशोरगीर गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम सोमवारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com