

पणन संचालकपदी
संजय कदमांची नियुक्ती
जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : राज्याच्या पणन विभागातील पणन संचालकपदाचा कार्यभार कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संंजय कदम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याअगोदर शरद जरे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. राज्य सहसचिव अजित देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ४) आदेशानुसार, कदम यांची पणन संचालकपदाच्या अतिरिक्त कार्यभारासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय कदम प्रशासनातील अनुभवी अधिकारी म्हणून परिचित असून, त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. जुलै २०२३ पासून ते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूरचे विभागीय सहनिबंधक म्हणूनही काम केले आहे. विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या हाताळण्याचा अनुभव असलेल्या कदम यांच्याकडे आता पणन संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने पणन विभागातील कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून शरद जरे यांच्याकडे यापूर्वीच महत्त्वाची जबाबदारी होती. त्याचबरोबर पणन संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीचे दैनंदिन कामकाज आणि राज्यस्तरीय पणन विभागाची जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांना काम करावे लागत होते.
आता पणन संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय कदम यांच्याकडे देण्यात आल्याने जरे यांच्यावरील दुहेरी जबाबदारी कमी होणार आहे.
दरम्यान, पणन संचालक म्हणून संजय कदम यांच्याकडे राज्यातील पणन विभागाशी संबंधित धोरणात्मक आणि प्रशासकीय कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी राहणार आहे. कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा अनुभव असल्याने कदम यांच्या अनुभवाचा पणन विभागाच्या कामकाजाला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.