चालत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या हातावर काठीने वार करून मोबाईल चोरी; दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

चालत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या हातावर काठीने वार करून मोबाईल चोरी; दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात
Published on

चालत्या एक्स्प्रेसमधून मोबाईल चोरी
दोन विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
९३ हजार रुपयांचे चार मोबाईल हस्तगत; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : चालत्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर रेल्वे रुळालगत लाकडी काठीने फटका मारून हातातील मोबाईल खाली पाडत चोरी करणाऱ्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ९३ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या मोबाईलच्या आधारे आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टला नाशिक रोड येथून एक्स्प्रेसने कल्याणच्या दिशेने दोन मुले प्रवास करीत होती. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ गाडी आल्यानंतर रेल्वे रुळालगत उभ्या असलेल्या काही मुलांनी बाहेरून काठीने त्यांच्या हातावर फटका मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्यानंतर संबंधितांनी मोबाईल उचलून गाडीवरून पलायन केले.
याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आंबिवली परिसरातून दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. पुढील चौकशीत आणखी तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या चारही मोबाईलची एकूण किंमत ९३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com