

पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींचा तत्काळ निपटारा करा
अतिरिक्त पालिका आयुक्त बांगर यांचे अभियंत्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडवा. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, वितरणाच्या वेळेतील बदल, जलवाहिन्यांमधील गळती तसेच अन्य तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास केवळ तात्पुरती उपाययोजना न करता तक्रारीच्या मूळ कारणांचा शोध घ्यावा. घटनास्थळी जाऊन समस्यांचा निपटारा करा. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी अभियंत्यांना दिले.
पालिकेच्या जल अभियंता विभागाची आढावा बैठक शुक्रवारी पालिका मुख्यालयात झाली. या वेळी अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी निर्देश दिले. उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप जल अभियंता मंगेश शेवाळे उपस्थित होते. या वेळी बांगर यांनी जल अभियंता विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्याशी संवाद साधला.
मुंबईत ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यातदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ३० सप्टेंबरला १०० टक्के पाणीसाठा असेल, तरच पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे, असे म्हणता येते. मात्र आज (ता. ४) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध धरणांतील पाणीसाठा सुमारे ९५ टक्के इतका आहे. तोपर्यंत मुंबई महानगरात लागू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन, पाणीपुरवठ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे अतिरिक्त पालिका आयुक्त बागर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.