मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा जल्लोष

मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा जल्लोष
Published on

मुंबई-ठाण्यात आज दहीहंडीचा जल्लोष

मुंबई, ता. ४ : जन्माष्टमीनिमित्त मुंबई, ठाण्यात उद्या (ता. ५) दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. शहरातील विविध भागांत दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले असून उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘गोविंदा आला रे’ने महामुंबईचा परिसर दुमदुमणार आहे.
मुंबईतील दादर, लालबाग, परळ, वरळी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, कांदिवली, बोरिवली, अंधेरी आदी भागांत सालाबादप्रमाणे विविध मंडळांकडून दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा नौपाडा, घोडबंदर रोड, कोपरी, भवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातही दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी कसून सराव केला आहे. गोविंदांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी महिला गोविंदा पथकेही सहभागी होणार आहेत. विविध मंडळांनी विजेत्या पथकांसाठी रोख बक्षिसांसह आकर्षक पारितोषिकांची घोषणा केली आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दहीहंडीच्या ठिकाणी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवाही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com