दिवेआगर समुद्रकिनारी तीन पर्यटक बुडता-बुडता बचावले

दिवेआगर समुद्रकिनारी तीन पर्यटक बुडता-बुडता बचावले
Published on

दिवेआगर समुद्रकिनारी
तीन पर्यटकांना जीवदान

श्रीवर्धन, ता. ५ (बातमीदार) : दिवेआगर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले पुणे येथील तीन पर्यटक समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. त्यांचा आवाज ऐकून होमगार्ड तसेच गोविंदा मिरवणुकीसाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत तिघांनाही पाण्याबाहेर काढले. या सतर्कतेमुळे तिघांचे जीव वाचले.

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील विसर्जन पॉइंट येथे दुपारी १२.३०च्या सुमारास पुणे येथील सहा पर्यटक पोहण्यासाठी गेले होते. या वेळी अभिषेक साळवे (वय २३), भूमी बोऱ्हाडे (२१) आणि आदित्य संदीप भिसे (२४) हे पाण्यात पोहत असताना समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये अडकले. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. तिघांचा आवाज ऐकून विसर्जन पॉइंटवरील पोर्ट केबिन येथे कर्तव्य बजावत असलेले होमगार्ड प्रेम रेवाळे, शशी भोकारे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जेटस्कीच्या साहाय्याने तिघांनाही समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पाण्यात बुडाल्याने तिघांच्या नाका-तोंडात पाणी गेले होते. त्यामुळे त्यांना तातडीने बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com