नवी मुंबईत क्लस्टर योजना लागू करणार

नवी मुंबईत क्लस्टर योजना लागू करणार
Published on

घणसोलीकरांना हक्काची घरे
नवी मुंबईत क्लस्टर योजना लागू करणार : शिंदे

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. घणसोली आणि परिसरातील नागरिकांना क्लस्टर विकास योजनेच्या माध्यमातून हक्काची घरे मिळवून दिली जातील, असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नवी मुंबईत आयोजित भव्य सार्वजनिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांनी ही घोषणा केली.
नगरसेवक सौरभ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला शिंदे यांनी हजेरी लावली. या वेळी उपस्थितांना शिंदे म्हणाले, ‘‘आपल्या लाडक्या भावांना आणि रहिवाशांना त्यांच्या हक्काची मोठी घरं मिळालीच पाहिजेत. ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही! सध्या जे नागरिक एका खोलीत किंवा १ बीएचकेमध्ये राहत आहेत त्यांना २ बीएचकेची मोठी घरं मिळाली पाहिजेत. १८० चौ. फुटांच्या जागेत लोकांनी किती दिवस काढायचे? नागरिकांना मोठं घर देण्याचं हे पुण्यकार्य आमचं सरकार नक्की पूर्ण करेल.’’
क्लस्टर पुनर्विकास योजनेचा उल्लेख करताना शिंदे पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात क्लस्टर योजनेला जन्म एकनाथ शिंदेनेच दिला आहे. आज ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेअंतर्गत ३० ते ३५ मजल्यांच्या भव्य इमारतींचे काम सुरू झाले आहे. तेथे महापालिका आणि सिडको मिळून काम करीत आहेत, तर मुंबईमध्ये म्हाडा आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून क्लस्टर विकास होत आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील घणसोलीकरांनाही क्लस्टर योजनेचा थेट लाभ दिला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com