सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम करतात - वनमंत्री ना..गणेश नाईक

सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम करतात - वनमंत्री ना..गणेश नाईक
Published on

शाळांमधून सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे मोठे काम
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून शिक्षकांचा गौरव
नेरूळ, ता. ६ (बातमीदार) ः पालिकेच्या शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे काम प्रभावीपणे होत आहे. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा आणि संस्कारांचा दर्जा उच्च असून, याचे सर्व श्रेय शिक्षकांना जाते, असे गौरवोद्गार वनमंत्री गणेश नाईक यांनी काढले. पालिका शिक्षण विभागाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिक्षक दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती रंजना सोनवणे, ड प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मोरे, फ प्रभाग समिती अध्यक्ष ललिता मढवी, एच प्रभाग समिती अध्यक्ष भरत भोईर, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शिक्षण विभाग उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, परिमंडळ १ उपायुक्त डॉ. अमोल पालवे, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, सहाय्यक आयुक्त सागर मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण पद्धतीत व शैक्षणिक साधनांमध्ये काळानुरूप बदल झालेला असला तरी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेली आदराची भावना आजही तीच असून, नवी मुंबई पालिका बदलत्या काळानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत चांगले बदल घडवित असल्याबद्दल नाईक यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी महापालिकेच्या शाळेत प्रामुख्याने गोरगरिबांची मुले शिकतात हे लक्षात घेऊन प्राथमिक शाळा हा पुढील जीवनप्रवासाचा पाया असून, तो पक्का करून घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये केजीचे वर्ग इंग्रजी भाषेत सुरू केल्याची माहिती दिली. उपमहापौर दशरथ भगत यांनी शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वातून होतो, असे सांगत देशाची भावी पिढी घडविणाऱ्या गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com