कळवा रुग्णालयाला अस्वच्छतेची बाधा

कळवा रुग्णालयाला अस्वच्छतेची बाधा
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अस्वच्छता, रुग्णांच्या जेवणात झुरळ आढळणे, जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणे तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. चार दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास ११ सप्टेंबरला रुग्णालयात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रुग्णालयातील समस्यांबाबत आव्हाड यांनी गटनेते कार्यालयात संबंधित महापालिका अधिकारी आणि रुग्णालय अधिष्ठाता यांची बैठक घेतली. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्याच्या घटनेनंतर रुग्णालयाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याचा दावा आव्हाड यांनी केला. कॅन्टीनलगतच्या शौचालयातच भांडी धुतली जात असल्याचे तसेच परिसरात बांधकामाचा राडारोडा पडल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांबाबत सहा महिन्यांपूर्वीही पाहणी केली होती; मात्र अद्याप परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

रुग्णालयाबाहेर जैववैद्यकीय कचरा आणि सॅनिटरी पॅडसारख्या वस्तू उघड्यावर टाकल्या जात असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर २४ तास काम केल्यानंतर वसतिगृहात विश्रांतीसाठी जातात; मात्र तेथेही अस्वच्छता असल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com