ग्रामसेवक बदली प्रक्रियेत अनियमिततेचा मनसेचा आरोप

ग्रामसेवक बदली प्रक्रियेत अनियमिततेचा मनसेचा आरोप
Published on

ग्रामसेवक बदली प्रक्रियेत अनियमिततेचा मनसेचा आरोप
बदलीनंतर रुजू न होणाऱ्यांवर कारवाईची मागणी; १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पनवेल, ता. ६ (बातमीदार) : पनवेल पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवकांच्या बदली प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुकाध्यक्ष सुजित सोनवणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत बदली आदेशांची नियमानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
पंचायत समितीमार्फत झालेल्या बदल्यांनंतर काही ग्रामसेवक नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत का, तसेच रुजू न झाल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम, १९६७ नुसार शिस्तभंगाची कारवाई केली आहे का, असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे. काही ग्रामसेवक अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचेही सोनवणे यांनी नमूद केले.
प्रशासनाने बदली प्रक्रियेतील पारदर्शकता स्पष्ट करावी आणि कथित भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत लेखी उत्तर देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

१५ दिवसांत कार्यवाहीची मागणी
बदली आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करून संबंधित प्रकरणाची चौकशी करावी. १५ दिवसांत योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुजित सोनवणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com