आयकर कॉलनीत दहीहंडीचा जल्लोष;

आयकर कॉलनीत दहीहंडीचा जल्लोष;
Published on

आयकर कॉलनीत दहीहंडीचा जल्लोष
‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : सीबीडी बेलापूर येथील आयकर कॉलनी परिसरात श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नगरसेविका, महिला जिल्हा प्रमुख, पालिका स्थायी समिती सदस्या आणि विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांच्या आयोजनातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. परंपरा, संस्कृती आणि उत्साहाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
दहीहंडी उत्सवासाठी परिसरातील १० ते १२ गोविंदा पथकांनी उपस्थिती लावत दहीहंडीला सलामी दिली. ढोल-ताशांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण आयकर कॉलनी परिसर दुमदुमून गेली होती. उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गोविंदांच्या साहसी कसरती आणि उत्साहपूर्ण प्रयत्नांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक थरावर गोविंदांचा उत्साह वाढत असताना उपस्थित नागरिकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
अखेर शिव सह्याद्री गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.
या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, उपशहरप्रमुख सदाशिव मनगुटकर, विभागप्रमुख नागेश चव्हाण, उपविभागप्रमुख संजय म्हात्रे, उपविभागप्रमुख माणिक पाटील, संघटक सुजाता म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख गीता पाटील यांच्यासह माधुरी पाटील, आशा पै, संगीता बोबले, रेणू रंजन, विनोदिनी पाटील, पार्वती शिंदे, सुमित्रा राठोड, पुष्पा महानर, वावी काळे, सुरेखा आवटे, उषा घुले, नसरीन पटेल, सारिका पाटील, लता आणि अलका आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com