

नवी मुंबई विमानतळ रस्त्यावर महिलेवर अतिप्रसंग
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या सेवा रस्त्यावर शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी एका महिला प्रवाशावर ॲप-आधारित कॅब चालकाने अतिप्रसंग आणि विनयभंगाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरून चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने विमानतळावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पीडित महिला तिच्या मित्रांसोबत मुंबईतील चेंबूर परिसरात एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री घरी परतण्यासाठी तिच्या मित्राने ऑनलाइन ॲपद्वारे एक कॅब बुक करून दिली. ज्याद्वारे महिला पनवेल येथील तिच्या निवासस्थानी जाण्यास निघाली होती. प्रवास सुरू असताना कॅब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर पोहोचली. या निर्जन रस्त्याचा गैरफायदा घेत कॅब चालकाने अचानक गाडी थांबवली आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने तो वाहनातून खाली उतरला. काही वेळाने चालक पुन्हा वाहनात आला. परंतु ड्रायव्हर सीटवर न बसता तो थेट मागील सीटवर एकट्या बसलेल्या महिला प्रवाशाच्या शेजारी जाऊन बसला. तेथे त्याने बळजबरीने महिलेचा हात पकडून तिचे कपडे काढण्याचा आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या अचानक उद्भवलेल्या संकटाच्या वेळी पीडित महिलेने अत्यंत धैर्याने आरडाओरड केली. चालकाला तीव्र प्रतिकार केला. महिलेने दाखवलेल्या या आक्रमक प्रतिकारामुळे चालक घाबरा त्यात महिलेने स्वतःची सुटका करून घेतली आणि कॅबमधून बाहेर पडली. त्यानंतर चालक तात्काळ वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. सुटका झाल्यानंतर पीडित महिलेने त्वरित आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी ती प्रथम पनवेल पोलीस ठाण्यात गेली. तेथील पोलिसांनी तिला नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात नेले. नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी चालकाची ओळख मोहम्मद अफजल शेख अशी पटवली असून त्याला अटक करण्यासाठी तांत्रिक बुद्धिमत्ता, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि कॅब ॲग्रिगेटर कंपनीच्या डेटाचा वापर करून विशेष शोधमोहीम राबवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.