

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : शहराच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या ३१६ सीसीटीव्हींपैकी तब्बल १२५ कॅमेरे सध्या बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सणासुदीच्या तोंडावर शहराचा ‘तिसरा डोळा’च बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे लाईन बाधित झाल्याचे सांगत दोन ते तीन दिवसांत कॅमेरे सुरू होतील, असा दावा पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी केला आहे.
उल्हासनगर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या ३१६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल १२५ कॅमेरे सध्या बंद आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा, प्रमुख चौक, रेल्वे स्थानके आणि मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढणार असतानाच शहराच्या सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’ ठप्प आहे. आमदार कुमार आयलानी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र देऊन बंद कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
चोरी, मारामारी, लूटमार तसेच अन्य गुन्ह्यांतील आरोपींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वपूर्ण ठरत असल्याने सर्व कॅमेरे २४ तास कार्यरत ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पावसामुळे एक लाईन बाधित झाल्याने कॅमेरे बंद पडले असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हे कॅमेरे पुन्हा सुरू होतील, असा दावा गोरे यांनी केला. सीसीटीव्हींची देखभाल करणाऱ्या कंपनीलाही पोलिसांनी तातडीने खराबी दूर करण्याबाबत पत्र दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.