रस्त्याचे काम ९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण

रस्त्याचे काम ९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण
Published on

रस्त्याचे काम ९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण
पळस्पे-कोन मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पाहणी
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पळस्पे फाटा ते कोन फाटा या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची ४ सप्टेंबर रोजी पाहणी करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनंतर झालेल्या या पाहणीदरम्यान संबंधित प्रशासन आणि कंत्राटदारांना कामाला वेग देऊन वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, तसेच कोळखे, डेरवली, कोन येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम आणि वाहनचालकांना येणाऱ्या अडचणींची पाहणी करण्यात आली.
या वेळी गवार कंपनीचे कंत्राटदार रोहित मलिक यांच्याशी कामाबाबत चर्चा करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारे भाग तातडीने मोकळे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्याचे संपूर्ण काम ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदारांनी दिले.
पळस्पे फाटा-कोन फाटा हा पनवेल परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून, दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होते. त्यामुळे कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी लवकर दूर होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कोंडीतून दिलासा
रस्त्याचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण झाल्यास पळस्पे फाटा-कोन फाटा मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह कोळखे, डेरवली, कोन आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन प्रवासातील वेळ आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com