उत्सव काळात मिठाईचा गोडवा झाला कडू

उत्सव काळात मिठाईचा गोडवा झाला कडू
Published on

उत्सवकाळात मिठाईचा गोडवा झाला कडू
महागाईमुळे दरात वाढ
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः श्रावणापासून दिवाळीपर्यंतचा काळ हा विविध सण-उत्सवांचा काळ म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा वाढत्या महागाईने उत्सवातील गोडवा काहीसा कडू केला आहे. साखर, गूळ, दूध, खवा, मसाले, सुकामेवा आणि गॅसच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम मिठाईच्या किमतींवर झाला असून, जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यंदा साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत होलसेल बाजारात साखर ४९ ते ५२ रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्याचबरोबर दुधाच्या दरातही वाढ झाली असून, दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने मिठाई उत्पादकांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या खव्याचे दरही वाढले असून, सध्या खवा २४० ते ३९० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. सुकामेवा, मसाले तसेच इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मिठाई विक्रेत्यांना दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे.
नवी मुंबईतील विक्रेत्यांनी सांगितले, की मिठाई निर्मितीसाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढता उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागत आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. एकीकडे गणेशोत्सव आणि आगामी नवरात्रोत्सव-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मोठी मागणी असते. मात्र, वाढत्या किमतींमुळे यंदा ग्राहकांना मिठाई खरेदी करताना बजेटचा विचार करावा लागत असून, उत्सवाच्या गोडव्यात महागाईची कडवट चव मिसळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सुकामेव्याच्या मिठाईने गाठला हजाराचा टप्पा
काही दुकानांमध्ये पेढे आणि बर्फी ८०० ते एक हजार रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तसेच बुंदी, बेसन आणि डिंकाचे लाडू ६०० ते ८०० रुपये प्रतिकिलो, हलवा ८०० ते १,४०० रुपये प्रतिकिलो, तर ड्रायफ्रूट चिक्की १,००० ते १,५०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com