

जनता दरबाराला
राजकीय आखाड्याचे स्वरूप!
स्वीकृत सदस्यांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया अर्ज भरण्याच्या दिवशी रद्द झाल्याचे पडसाद सोमवारी (ता. ७) महापौर अश्विनी निकम यांच्या जनता दरबारात उमटले. संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी महापौरांना घेरत निर्णयाचा जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत ‘महापौर हाय हाय’च्या घोषणा दिल्याने जनता दरबारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जनता दरबार काही काळ राजकीय आखाड्यात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महापौर अश्विनी निकम यांच्या वतीने आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींवर सुनावणी सुरू होती. याच वेळी भाजपचे पदाधिकारी बाळा श्रीखंडे, कपील अडसूळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते तेथे दाखल झाले. स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाच ती अचानक रद्द का करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. या मुद्द्यावरून भाजप पदाधिकारी आणि महापौर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे सांगण्यात आले.
महापौरांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी ‘महापौर हाय हाय’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे जनता दरबारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर महापौर अश्विनी निकम कोणतीही प्रतिक्रिया न देता जनता दरबारातून निघून गेल्या. या घटनेमुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप-शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.