

गांजाची विक्री करणाऱ्या
२५ वर्षीय तरुणाला अटक
८० हजार रुपयांचा गांजा जप्त; नेतिवली परिसरात सापळा रचून कारवाई
कल्याण, ता. ७ (बातमीदार) : कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात धडक कारवाई केली आहे. बेकायदा गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ८० हजार रुपये मूल्याचा १.६३५ किलोग्रॅम गांजा आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
रविवारी (ता. ६) कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे गस्ती पथक परिसरात गस्त घालत असतांना सहाय्यक पोलिसांना नेतिवली भागात एक तरुण गांजाविक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नेतिवलीत एका सोसायटीच्या परिसरात सापळा रचला. दुपारी सुमारे ४ वाजता सोसायटी कार्यालयाच्या मागे संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान पोलिसांना त्याने आपले नाव जगत रामरूप मुखीया (वय २५) असे सांगितले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे १.६३५ किलोग्रॅम वजनी गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे बाजारपेठीय किंमत ८० हजार रुपये आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.