

मालाडमध्ये पाण्याचा प्रश्न पेटला
गणेशोत्सवाच्या तोंडावर नगरसेवकांचे महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
मालाड, ता. ८ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालाड परिसरातील नागरिकांना अपुरा, कमी दाबाने तसेच अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. या प्रश्नावरून मालाड पश्चिमेतील पी-पूर्व आणि पी-पश्चिम प्रभाग कार्यालयात झालेल्या समितीच्या सभेत नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
प्रभाहैदर अली शेख, नगरसेवक अजित रावराणे यांनी हातात भांडे घेऊन महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला स्थायी समिती सदस्य व नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी पाठिंबा दिला. परिमंडळ-४ चे उपायुक्त यांनी प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती करण्यात आली होती, मात्र ‘पाण्याचा प्रश्न जल अभियंता विभागाशी संबंधित असून, त्याचा आमच्याशी संबंध नाही,’ अशी भूमिका घेत उपायुक्तांनी जबाबदारी झटकली, असा आरोप आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी केला.
प्रशासनाच्या या भूमिकेवर नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जनतेच्या जीवनाशी निगडित असलेल्या पाणीप्रश्नासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरत असताना प्रशासनाने जबाबदारी झटकणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली.
पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले. आंदोलनाला पाठिंबा देत महापालिका कार्यालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. गणेशोत्सवात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी योगिता कोळी, गीता भंडारी, संगीता कोळी, हैदर अली शेख, कमरजहां सिद्दीकी, रफिक शेख, तुळशीराम शिंदे यांच्यासह इतर नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले.
आंदाेलन अधिक तीव्र करणार
प्रशासनाने पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे. त्यामुळे मालाडमधील पाणीप्रश्न आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तातडीने उपाययोजना करा!
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मालाडमधील नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.