

अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाला पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमणबाग हायस्कूलमधील ५५ शिक्षकांच्या गटाने नुकतीच भेट दिली. विद्यालयाच्या उपक्रमशील कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यासदौरा झाला.
विद्यालयातील दृक्-श्राव्य कक्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षकांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पंचपदी, पंचकोश विकास, पालक संवाद, पालकांचा सहभाग आणि प्रबोधन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आठवीतील विद्यार्थी सोहम भांगरथ याने सादर केलेल्या गीताचे शिक्षकांनी कौतुक केले.
वर्गातील अध्यापन प्रक्रियेत पंचपदीचा विषयानुसार केला जाणारा वापर हा अभ्यासदौऱ्याचा विशेष भाग ठरला. रमणबाग हायस्कूलचे शालेय समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी पालकांशी संवाद साधला. महात्मा गांधी विद्यालयाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानताना मुख्याध्यापिका आशा माने यांनी, आमच्या विद्यालयातही अशा प्रकारचे उपक्रम निश्चितपणे राबवू. तुम्हीही आमच्या शाळेला भेट द्यावी, असे आवाहन केले. यानंतर शिक्षकांचा गट संस्थेच्या भाऊसाहेब परांजपे विद्यालयातील पंचकोशाधारित गुरुकुल या बारा तासांच्या शाळेला भेट देण्यासाठी रवाना झाला.
अभ्यासदौऱ्यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष भणगे, राजेश रोहिदास, अतुल कुसुंबे, तुषार सोनजे, वागिश वरखेडकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी तसेच रमणबाग हायस्कूलचे महेश जोशी, मंजुषा शेलुकर, अंजली गोरे आणि अन्य शिक्षक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.