

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : उत्सव साजरा करताना इतरांना त्रास किंवा गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपावा, असेही आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडळांना केले. ठाणे गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, अभिनेता अजिंक्य देव, प्रा. प्रदीप ढवळ, शिवसेना सचिव संजय मोरे उपस्थित होते.
गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. ही परंपरा ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. आनंद दिघे यांनी गणेश दर्शन स्पर्धेबरोबरच गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवासारख्या उत्सवांना सामाजिक बांधिलकीची जोड दिली. गणेश मंडळांना भेटी देताना सजावट, आरास, विषय आणि त्यासाठी झालेला खर्च याची बारकाईने माहिती घेत असत. मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतः सजावट केली आहे का, यालाही ते महत्त्व देत असत, असे शिंदे यांनी सांगितली. आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, गरजूंना मदत तसेच संकटाच्या काळात धावून जाण्याचे कामही मंडळे करतात. त्यामुळे गणेश मंडळे सामाजिक भान जपणारी केंद्रे बनली आहेत, असे शिंदे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.