सिडको महामंडळाने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांवर कारवाई

सिडको महामंडळाने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांवर कारवाई
Published on

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर व भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज टाकणाऱ्या डम्परचालकांची सिडकोकडून धरपकड सुरूच आहे. गत शनिवारी मध्यरात्री नवी मुंबईतील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यासाठी आलेले सहा डम्पर सिडकोच्या पथकाने वाशी टोलनाक्याजवळ पकडले. त्यानंतर सिडकोच्या पथकाने या सहा डम्परचालकांविरोधात वाशी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करून सर्व डम्पर जप्त केले आहेत.

सिडको महामंडळाने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत असून हे डेब्रिज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग व पोलिस पथकाकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई येथून वाशी खाडीपूलमार्गे मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रिज घेऊन काही डम्पर नवी मुंबईत येत असल्याची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सिडकोच्या पथकाने डेब्रिजने भरलेले सहा डम्पर ताब्यात घेतले.

या कारवाईत पकडण्यात आलेल्या सहा डम्परच्या चालकाविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तसेच संबंधित पोलिस ठाण्यात कळविण्यात यावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com