अकरावीच्या ऑफलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभाग हतबल संस्थाचालक आणि क्लासेसच्या इंटिग्रेटेडने विभागाची कोंडी

अकरावीच्या ऑफलाईन प्रवेशासाठी  शिक्षण विभाग हतबल
संस्थाचालक आणि क्लासेसच्या इंटिग्रेटेडने विभागाची कोंडी
Published on

अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभाग हतबल

संस्थाचालक आणि क्लासेसच्या इंटिग्रेटेडने विभागाची कोंडी

मुंबई, ता. ८ : गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळावा, यासाठी न्यायालयाने दिलेले आदेशच पायदळी तुडवून संस्थाचालक आणि क्लासेसच्या हितासाठी अकरावी प्रवेशाच्या फेऱ्यांवर फेऱ्या आयोजित करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाची संस्थाचालक आणि क्लासेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदा इंटिग्रेटेडने विभागाची कोंडी केली आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये संस्थाचालकांनी अकरावीचे अनधिकृतपणे प्रवेश ऑफलाइन केले असून, याची आता विभागाने उशिरा दखल घेत अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी आदेश जारी केले आहेत, तर उशिरा जाग आलेले शालेय शिक्षण विभाग हे अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशासाठी संस्थाचालकांपुढे हतबल झाल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
शालेय शिक्षणच्या माध्यमिक संचालनालयाने आज जारी केलेल्या आदेशात अकरावीच्यामध्ये केंद्रिय ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे प्रवेश देणे बंधनकारक असताना काही कनिष्ठ महाविद्यालयात ऑफलाइन पद्धतीने मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अनाधिकृतपणे प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृत प्रवेश कायदेशीर करण्याची मागणी
ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी बेकायदा ऑफलाइन प्रवेश दिलेले आहेत, त्यातील अनेक संस्थांनी हे प्रवेश कायदेशीररीत्या नियमित करण्यासाठी संबंधित उपसंचालक कार्यालयांपासून ते शिक्षण संचालकांपर्यंत केले आहेत. हे प्रवेश नियमित करण्याची मागणी त्यांनी केली असल्याचेही आज विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असे दिले बेकायदा प्रवेश
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ही विविध फेऱ्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने सुरू असतानाही काही महाविद्यालयांनी बेकादा ऑफलाइन प्रवेश दिले आहेत. यात मोठ्या प्रमाणात खासगी क्लासेस आणि संबंधित महाविद्यालयांची युती असल्याने हे प्रवेश झालेले आहेत. राज्यात सध्या या इंटिग्रेटेडवर कारवाई करण्यासाठी विभागाचे अधिकारीही धजावत नसल्याने राज्यात यासाठी हजारो कोटींचा बेकायदा धंदा जोरात असून, त्यातूनच हे ऑफलाइन प्रवेश झाले असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com