‘मी जे कल्पिलेच नाही’ आत्मचरित्राचे प्रकाशन

‘मी जे कल्पिलेच नाही’ आत्मचरित्राचे प्रकाशन
Published on

विरार, ता. ८ (बातमीदार) : सिडनी जे. मोरायस लिखित ‘मी जे कल्पिलेच नाही’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पाली चर्च येथे उत्साहात करण्यात आले. चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर विजय आल्मेडा यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.

सिडनी जस्टीन मोरायस, पाली, वसई यांचा जन्म ६ सप्टेंबर १९५१ मध्ये झाला. त्यांच्या जीवनातील संघर्ष, यश, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्याचा प्रदीर्घ प्रवास ‘मी जे कल्पिलेच नाही’ या आत्मचरित्रातून वाचकांसमोर उलगडला आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव आणि संघर्ष शब्दबद्ध करताना परिस्थितीशी दोन हात करून उभे राहण्याची जिद्द, मिळवलेले यश आणि कल्पनेच्या पलीकडे घडलेला जीवनप्रवास यांचे प्रेरणादायी दर्शन या पुस्तकातून घडते. विशेष म्हणजे, एसव्हीपी सेवा संस्थेच्या माध्यमातून तब्बल ५० वर्षे अविरत आणि निःस्वार्थ सेवा करण्याचा मान सिडनी मोरायस यांच्या कार्याला लाभला आहे. पाली चर्च येथे ४ ऑक्टोबर १९७५ मध्ये त्यांच्या या सेवाकार्याची सुरुवात झाली. गरजू आणि वंचित घटकांसाठी विविध माध्यमातून सेवा करत त्यांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने जपली.

सिडनी मोरायस यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत असतानाच त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या जीवनकार्याचा, संघर्षाचा आणि सेवाभावी वाटचालीचा गौरव करणारे हे आत्मचरित्र अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com