‘वाचनासाठी एकत्र येऊया’ उपक्रम

‘वाचनासाठी एकत्र येऊया’ उपक्रम
Published on

‘वाचनासाठी एकत्र येऊया’ उपक्रम
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
कांदिवली, ता. ८ : सह्याद्रीनगर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘रूम टू रीड’ प्रस्तुत बालवाचनालयाच्या माध्यमातून ‘चला थांबूया, पुस्तक उघडूया!’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे अनेक आजी-आजोबा वाचन उपक्रमात सहभागी झाले. इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अन्वित भापकर याची आजी वत्सला दादासो भापकर यांनी पुस्तकातील एक गोष्ट माईकवरून अस्खलितपणे वाचून दाखवत उपस्थितांची दाद मिळवली.
दुपारी १ ते १.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वाचन उपक्रमात तब्बल ३६ पालक, ८७ विद्यार्थी, ५ शिक्षक आणि २ शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्रितपणे ३० मिनिटे पुस्तक वाचन करून वाचनाचा आनंद घेतला.
या वेळी शाळा समितीचे मदन चव्हाण, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती ताईगडे, उपाध्यक्षा शीतल डुबल, सिद्धी कावणकर, प्रियांका पवार, माजी व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीता सोळस्कर, हेमलता भागवत उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन ललिता राऊत, उपक्रमशील शिक्षिका दीपा उप्पलकर, श्रीधर नादरगे, करुणा मोरे, श्रुतिका पाटील यांनी केले.
मुख्याध्यापक उमाकांत जगताप यांनी प्रास्ताविक करत रूम टू रीड प्रस्तुत बालवाचनालय व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन शाळेत वाचन संस्कृतीचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com